कर्मयोग जगणं हे काय असतं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री बनकर थोडगे ,सरपंच, गगन बावडा यांचे कॅन्सर रुग्णांसाठी केलेले कार्य! गगन  बावडा परिसरामध्ये श्री बनकर थोडगे हे देवदूत म्हणून ओळखले जातात कारण कुठलाही कॅन्सर रुग्ण आढळल्यास त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून त्यांनी आत्तापर्यंत ६० पेक्षाही जास्त कॅन्सर रुग्णांना मदत  केली आहे.आज कोल्हापूर कॅन्सर सेन्टर मध्ये त्यांच्या या महान कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा सत्कार डॉ रेश्मा पवार, डॉ योगेश अनाप, डॉ प्रसाद तानवडे यांच्या हस्ते केला गेला.कोल्हापूर कॅन्सर सेन्टर अश्या देवदूतांचा कायमच ऋणी राहील