गोर गरीब गरजू रुग्णांना कोल्हापूर कॅन्सर सेन्टरने नेहमीच सर्वतोपरी मदत केलेली आहे आणि त्यामध्ये इतर संस्थासुद्धा हातभार लावीत आहेत

दि २१ ऑगस्ट २०२१ रोजी कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ-शिरगाव, कोल्हापूर येथे कॅन्सर वरील उपचार घेत असणाऱ्या गरजू रुग्णांना अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुरज पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

TBMSG , पुणे या सामाजिक संस्थे अंतर्गत काम करणाऱ्या बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल, वाठार रोड, पेठ-वडगाव यांनी सदरचे अन्न धान्य वाटप हे त्यांना मिळणाऱ्या मदत निधीमधून कोल्हापूर कॅन्सर सेन्टरला पुरविले. या कार्यक्रमात बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल तर्फे प्रकल्प प्रमुख श्री. निलेश कटकोळे, अधीक्षक श्री. दीपक शिवशरण, सदस्य श्री. आर्यकुमार आणि कोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे डॉ. योगेश अनाप, डॉ. प्रसाद तानवडे , डॉ. निलेश धामणे , संस्थेचे सी ई ओ डॉ. शिरीष भामरे आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सदर अन्न धान्य वाटपाचा लाभ ३० पेक्षाही जास्त कुटुंबांनी घेतला. डॉ सुरज पवार यांनी बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल च्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.